Monday, 13 June 2011

atri rushi

                         अत्रि ऋषी 
                ----------------------------------------
       १ ]दुर्वास            २ ]दत्तात्रय             ३ ]चंद्र [सोम ]
                             श्रीपाद श्रीवल्लभ 
                          श्री नृसिह सरस्वती 
                         श्री अक्कल कोट स्वामी 
          ब्रह्मर्षी अत्रि व  अनुसूया 
चंद्रात्रेय म्हणजे सोम वंशी व कृष्णात्रेय म्हणजे दुर्वास वंशीय होत. सोम ब्रह्मदेवाचा अवत्तार तर दुर्वास श्री शंकराचा अवतार होय .
 

Thursday, 9 June 2011

shree dattache 16 avataar

श्री दत्ताचे १६ अवतार 
१ ] योगीराज -कार्तिक शु .१५ 
२ ] अत्रिवरद -कार्तिक कृ.१ 
३ ] दतात्रेय -कार्तिक कृ .२ 
४ ] कालाग्नीशमन -मार्गशीर्ष शु .१४ 
५ ] योगीजनवल्लभ -मार्गशीर्ष शु .१५
६ ] लीलाविश्वंभर -पौष शु .१५
७ ] सिद्धराज -माघ शु . १५
८ ] ज्ञानसागर -फाल्गुन शु .१०
९ ] विश्वंभर -चैत्र शु .१५
१०] मायामुक्त -वैशाख शु .१५
११] माया मुक्त -ज्येष्ठ शु .१३
१२] आदिगुरु -आषाढ शु .१५
१३] शिवरूप -श्रावण शु .८
१४] देवदेव -भाद्रपद शु .१४
१५] दिगंबर -अश्विन शु .१५
१६] कृष्णश्यामकमलनयन -कार्तिक शु .१२
    
 

Wednesday, 8 June 2011

Guru Charitra bodh.


गुरु चरित्र अध्याय १५ 
 तीर्थ यात्रा वर्णन 
पंचदशी श्री गुरुमूर्ती |तीर्थे सांगती शिष्याप्रती |
यात्रे दवडुनी गुप्त होती |वैजनाथी श्री गुरु |
श्रीगुरु वैजनाथी येथे गुप्त रूपाने राहिलेकारण सर्वजण,सज्जन -दुर्जन  त्याचे शिष्य होण्यासाठी  वरदानासाठी त्याच्या दर्शनाला यऊ लागले .सर्व शिष्याना बोलावून तीर्थ यात्रे साठी जाण्यास सांगितले  स्वतः ला श्री शैल्य येथे भेटावे आसे सांगितले.
शिष्य म्हणाले, 'तुमचे चरण कमळातच  सर्व तीर्थे वास करीत आहेतमग आम्हाला दुसरी तीर्थ यात्रा कशाला ?
श्री गुरुनी उत्तर दिले, 'संन्याशांनी एके ठिकाणी पाच दिवसापेक्षा जास्त राहू नयेतीर्थाटन करून नंतर स्थिर मनाने एके ठिकाणी  राहावेविशेष म्हणजे आमची आज्ञा  शब्द म्हणून तुम्ही त्याचे पालन करावे नंतर बहुधान्य संवत्सरी  आमचे भेटीस श्रे शैल्यला तुम्ही यावे ' 
गुर्वाज्ञा शिरसावंद्य  करून कोणती कोणती तीर्थे आचरावी  म्हणून शिष्यांनी श्रीगुरुना विचारलेश्रीगुरुंनी त्याना पहिल्याने 'तीर्थराज काशी विख्यात ' हे सांगितले नंतर अनेक तीर्थ स्थाने सांगितली .
श्रीगुरुची आज्ञा प्रमाण मानून सर्व शिष्य  यात्रेला गेले.श्रीगुरू गुप्त रूपाने राहिले फक्त 'सिद्ध \हे शिष्य श्रीगुरो बरोबर राहिलेश्रीगुरुंनी त्याना ठेवून घेतले  यामुळेच तर सिद्धांनी 'श्रीगुरुचरित्र 'महिमा वर्णन करून सांगितला   सरस्वती गंगा धराने तो लिहून ठेवला 
समस्त शिष्य तीर्थेसी |स्वामी निरोपे गेले परियेसी |
सेवा करीत अनुक्रमे | असे सिद्ध म्हणतात |

त्या काळीही धूर्त,कपटी लोक होतेच स्वतःचे दुष्ट हेतू साध्य करण्यासाठी असे लोक श्रीगुरू दर्शनाला येत.
  साधू असाधु धूर्त सकळी|समस्त येती श्री गुरु जवळी |
 वर्तमानी खोटा कळीसकळही शिष्य होऊ म्हणती |
 उबगोनी भार्गव राम देखा |गेला सागर मध्योदका|
गौप्य रूपे असे ऐका|आणिक मागतील म्हणोनी |
तेथे श्री गुरु मूर्ती ऐकराहिले गुप्त  कारणिक|
वर मागतील सकळीक | नाना याती येवोनिया |
म्हणून श्रीगुरू गुप्त राहिले |
विश्वव्यापक जगदीश्वर |तो काय देऊ  शके वर |
पाहुनी भक्ती पात्रानुसार | प्रसन्न होय परियेसा |
  तीर्थाटन  केल्यामुळे अनेक ठिकाणे पहाण्यास मिळतात .निरनिराळी परिस्थिती अवलोकन करण्यात येते .सांप्रदाय वाढविता येतोमनाला स्थैर्य येतेचित्त शुद्धी होते एकाच ठिकाणी राहण्याने त्या स्थाना बद्दल आसक्ती मोह उत्पन्न होतोम्हणून श्री गुरु म्हणाले;
तुम्ही आश्रमी संन्यासी | राहू नये पांच दिवशी |
एके ठायी वास करीत |
चतुर्थांश्रम घेउनी |आचरावी तीर्थ भुवनी |
तेथे मनी स्थिर होवुनी | मन राहावे एके स्थानी |
श्रीगुरूना सोडून शिष्याना जावेसे वाटेना म्हणून श्रीगुरू म्हणाले ,'विशेष वाक्य आमुचे ऐक |अंगिकारणे धर्म अधिक |' - 'गुरु म्हणून माझी आज्ञा पालन करणे तुमचा धर्म आहेमाझे शब्द गुरु म्हणून तुम्ही मानलेच पाहिजेत'.
श्री समर्थांनीही श्री दासबोधाचे सहाव्या दशकातल्या 'देवशोधन नामसातव्या समासात हेच उत्तर श्रोत्यांना दिले आहेश्रोत्याने विचारले:"सगुण नाशिवंत ऐसे सांगतापुन्हाभजन करावे म्हणतातरी कशासाठी आताभजन करू|| ऐसे श्रोतयाचे बोलणेशब्द बोले निर्बुजलेपणे याचे उत्तर ऐकणेम्हणे वक्ता|| गुरुचे वाचन प्रतिपाळणहे मुख्य परमार्थाचे लक्षणवचनभंग करिता विलक्षणसहजेची जाले|| म्हणोनी आज्ञेसी वंदावेसगुणभजन मानावे | श्रोता म्हणे हे देवे | का प्रयोजिले || " श्री गुरुनी अनेक तीर्थे सांगितली त्यांत गाणगापुरऔदुंबरनृसिंहवाडी यांचा समावेश आहेदुसर्या अनेक तीर्थांचा महिमाही या अध्यायात वर्णिला आहे.     

Monday, 30 May 2011


श्री गुरुचरित्र 
अखण्ड मण्डलाकारं व्याप्तं येन चराचरम्| तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः |
श्री गुरुचरित्र म्हणजे गुरुचे चरित्र ,म्हणजेच शिष्यास दिलेली शिकवण होय .गुरु चरित्राची विभागणी तीन काण्डात केलेली आहे 
अध्याय ते २४  ज्ञान कांड 
अध्याय २५ ते ३७ कर्म कांड 
अध्याय ३८ ते ५१ भक्ती कांड 
अवतरणिका ५२ 
अध्याय नाम धारकाला श्री गुरु दर्शनाची  असलेली तळमळ त्याला झालेले श्री गुरु दर्शन 
               सृष्टीची उत्पती ,सिद्ध नाम धारक संवाद ,गुरुमहिमा 
                ईश्वराच्या दशावताराचे कारण 
                श्री दत्तंप्रभूंचा अवतार 
             ते १० श्री पादश्रीवल्लभचा अवतार  त्याचे चरित्र 
           ११ ते ५१  श्री नृ सिंह सरस्वती याचा अवतार त्याचे चरित्र 
           ५२ अवतरणिका 


विषयानुसार अध्यायांची विभागणी :
. अतिथीसत्कार : . , , , १८ , २२ .
. पतिनिष्ठा   पतिव्रता धर्म : . , २० , २१ , ३० , ३१ , ३२ .
. श्रीगुरुंबद्दल निष्ठा , गुरुसेवा , गुरुभक्ती : . , ,१० , ११ , १३ , १४ , १६ , १७ , १८ , २२ , ४० , ४१ , ४९ .
. स्थानमहात्म्य : . , १० , १५ , १७ , १८ , १९ , २० , २१ , ४१ , ४८.
. मूढांचा भ्रमनिरास गर्वपरिहार : . २४ , २७ , ४४ , ४५ .
. पूर्व संस्कारांचा प्रभाव : . , , ११ , ३३ , ४३ , ५० .
. भक्तपरीक्षा : . १८ , २२ ,४७ .
. भक्तसंतोष : . १३ , २३ , ३८ , ३९ , ४० ,४१ , ४३ , ४६ ,५० .
. निष्पाप साधेभोळे भक्त : . , १७ ,१९ ४३ , ४७ .
१०. भक्तव्याधि संकटनिरसन : . १३ , १४ , २० , २१ , ३० , ३१ , ३२ , ४० , ४४ ,४८ .
११ . तत्वज्ञान : . १२ , २० , २१ ,३१ , ३२ ,५० .