Wednesday, 8 June 2011

Guru Charitra bodh.


गुरु चरित्र अध्याय १५ 
 तीर्थ यात्रा वर्णन 
पंचदशी श्री गुरुमूर्ती |तीर्थे सांगती शिष्याप्रती |
यात्रे दवडुनी गुप्त होती |वैजनाथी श्री गुरु |
श्रीगुरु वैजनाथी येथे गुप्त रूपाने राहिलेकारण सर्वजण,सज्जन -दुर्जन  त्याचे शिष्य होण्यासाठी  वरदानासाठी त्याच्या दर्शनाला यऊ लागले .सर्व शिष्याना बोलावून तीर्थ यात्रे साठी जाण्यास सांगितले  स्वतः ला श्री शैल्य येथे भेटावे आसे सांगितले.
शिष्य म्हणाले, 'तुमचे चरण कमळातच  सर्व तीर्थे वास करीत आहेतमग आम्हाला दुसरी तीर्थ यात्रा कशाला ?
श्री गुरुनी उत्तर दिले, 'संन्याशांनी एके ठिकाणी पाच दिवसापेक्षा जास्त राहू नयेतीर्थाटन करून नंतर स्थिर मनाने एके ठिकाणी  राहावेविशेष म्हणजे आमची आज्ञा  शब्द म्हणून तुम्ही त्याचे पालन करावे नंतर बहुधान्य संवत्सरी  आमचे भेटीस श्रे शैल्यला तुम्ही यावे ' 
गुर्वाज्ञा शिरसावंद्य  करून कोणती कोणती तीर्थे आचरावी  म्हणून शिष्यांनी श्रीगुरुना विचारलेश्रीगुरुंनी त्याना पहिल्याने 'तीर्थराज काशी विख्यात ' हे सांगितले नंतर अनेक तीर्थ स्थाने सांगितली .
श्रीगुरुची आज्ञा प्रमाण मानून सर्व शिष्य  यात्रेला गेले.श्रीगुरू गुप्त रूपाने राहिले फक्त 'सिद्ध \हे शिष्य श्रीगुरो बरोबर राहिलेश्रीगुरुंनी त्याना ठेवून घेतले  यामुळेच तर सिद्धांनी 'श्रीगुरुचरित्र 'महिमा वर्णन करून सांगितला   सरस्वती गंगा धराने तो लिहून ठेवला 
समस्त शिष्य तीर्थेसी |स्वामी निरोपे गेले परियेसी |
सेवा करीत अनुक्रमे | असे सिद्ध म्हणतात |

त्या काळीही धूर्त,कपटी लोक होतेच स्वतःचे दुष्ट हेतू साध्य करण्यासाठी असे लोक श्रीगुरू दर्शनाला येत.
  साधू असाधु धूर्त सकळी|समस्त येती श्री गुरु जवळी |
 वर्तमानी खोटा कळीसकळही शिष्य होऊ म्हणती |
 उबगोनी भार्गव राम देखा |गेला सागर मध्योदका|
गौप्य रूपे असे ऐका|आणिक मागतील म्हणोनी |
तेथे श्री गुरु मूर्ती ऐकराहिले गुप्त  कारणिक|
वर मागतील सकळीक | नाना याती येवोनिया |
म्हणून श्रीगुरू गुप्त राहिले |
विश्वव्यापक जगदीश्वर |तो काय देऊ  शके वर |
पाहुनी भक्ती पात्रानुसार | प्रसन्न होय परियेसा |
  तीर्थाटन  केल्यामुळे अनेक ठिकाणे पहाण्यास मिळतात .निरनिराळी परिस्थिती अवलोकन करण्यात येते .सांप्रदाय वाढविता येतोमनाला स्थैर्य येतेचित्त शुद्धी होते एकाच ठिकाणी राहण्याने त्या स्थाना बद्दल आसक्ती मोह उत्पन्न होतोम्हणून श्री गुरु म्हणाले;
तुम्ही आश्रमी संन्यासी | राहू नये पांच दिवशी |
एके ठायी वास करीत |
चतुर्थांश्रम घेउनी |आचरावी तीर्थ भुवनी |
तेथे मनी स्थिर होवुनी | मन राहावे एके स्थानी |
श्रीगुरूना सोडून शिष्याना जावेसे वाटेना म्हणून श्रीगुरू म्हणाले ,'विशेष वाक्य आमुचे ऐक |अंगिकारणे धर्म अधिक |' - 'गुरु म्हणून माझी आज्ञा पालन करणे तुमचा धर्म आहेमाझे शब्द गुरु म्हणून तुम्ही मानलेच पाहिजेत'.
श्री समर्थांनीही श्री दासबोधाचे सहाव्या दशकातल्या 'देवशोधन नामसातव्या समासात हेच उत्तर श्रोत्यांना दिले आहेश्रोत्याने विचारले:"सगुण नाशिवंत ऐसे सांगतापुन्हाभजन करावे म्हणतातरी कशासाठी आताभजन करू|| ऐसे श्रोतयाचे बोलणेशब्द बोले निर्बुजलेपणे याचे उत्तर ऐकणेम्हणे वक्ता|| गुरुचे वाचन प्रतिपाळणहे मुख्य परमार्थाचे लक्षणवचनभंग करिता विलक्षणसहजेची जाले|| म्हणोनी आज्ञेसी वंदावेसगुणभजन मानावे | श्रोता म्हणे हे देवे | का प्रयोजिले || " श्री गुरुनी अनेक तीर्थे सांगितली त्यांत गाणगापुरऔदुंबरनृसिंहवाडी यांचा समावेश आहेदुसर्या अनेक तीर्थांचा महिमाही या अध्यायात वर्णिला आहे.     

No comments:

Post a Comment