तर्क, वितर्क , चिकित्सा केली कि, भलभलते संशय , शंका उत्पन्न होऊन श्रद्धा न राहता , ती दृढ न होता तिला तडा जातो , शंकानिरसन तर होत नाहीच ; पण संश्यापिशाच्चाचे तावडीत मात्र मनुष्य सापडतो. भलतीच चिरफाड करून मनाचे समाधान तर होत नाहीच ; उलट मनुष्य गंटागळचाच खात राहतो .'शंशयात्मा विन्श्यती '। आपल्याला या बालकासारखा भोळा भाव व श्रद्धा हवी . भोळ्या भावाने भक्ती करणारे व श्रद्धा ठेवणारे जीव उद्धरून गेले आहेत. मोठे मोठे वाक्पंडित, वाय्याकर्णी ,तर्कशास्त्रज्ञ ,शास्त्री ,चिकित्सक असेच गंटागळया खात राहिले. ते शंका उपस्थित करून स्वतःचे किंवा कोणाचेच समाधान करू शकत नाहीत
." परि साला लोखंड लागले म्हणजे त्याचे सोने होते , पण रुपयाचे काही सोने होत नाही. आपणास दिनाहून दीनाहून दीन म्हणजे अभिमानरहित झाले पहिजे. असे झाले म्हणजे परमात्म्यास अनन्यशरण जाता येईल. हे होण्यास त्याची कृपाच पाहिजे व ती नित्य भाकावी
."