Friday 9 December 2011

Datta janma

त्रिमूर्ती अवतार  अर्थातच दत्त जन्म -
चतुर्थी अध्यायी  अनुसुयेप्रती | छळावया  येती |
परी तियेचे पुत्र होती |स्तनपान करिती आनंदे |
ब्रह्मदेवाचे सात पुत्रांपैकी अत्री हे एक पुत्र होते .' तेथुनी पीठ गुरु संतती |' अत्री ऋषीची पत्नी अनुसूया .ती अत्यंत पतिव्रता ,सुंदर ,पतिसेवा दक्ष ,अतिथी पूजा दक्ष अशी होती .'पतिसेवा करी भक्तीसी |मनोवाक्काय  कर्मेसी|अतिथी पूजा  महाहर्षी |विमुख नव्हे कवणे काळी |' अशी होती .ती कोणाला शाप देईल किवा कोणाला वर देऊन आपले स्थान हिरावून घेईल म्हणून देवाना व इंद्राला भीती पडली ,तिचे सत्व हरण करण्यास ब्रह्मा ,विष्णू ,महेश अशी त्रिमूर्ती अत्री मुनी संध्या वंदनास गेले असता  त्याच्या आश्रमात आली व सती अनुसूये जवळ भोजनाची भिक्षा [इच्छा भोजन ]त्यांनी मागितली .तिने सर्व तयारी करून  भोजनास बसण्यास सांगितले असता ,'आम्हाला तू नग्न होवून वाढ 'अशी त्यांनी मागणी केली .'नाहीतर आम्ही निघून जाऊ ',असे ते म्हणाले .सती अनुसूयेने विचार केला -
माझे मन असे निर्मळ|काय करील मन्मथ खळ|
पतीचे असे जरी ताप फळ | तारील मज म्हणतसे |
मग तिने त्याची इच्छा पूर्ण करण्याचा संकल्प केला .पाकस्थानी जाऊनी पतीच्या  चरणाचे चिंतन करून 'म्हणे अतिथी बाळे माझी |'
ती अतिथी ना वाढावयास आली ,तो त्रय मूर्तीची बालके झालेली !तिघाना तिने स्तन पान देऊन त्याची क्षुधा निवारण केली .
;स्तन पान मात्रे क्षुधा गेली |तपफळ ऐसे पती व्रतेचे |ती त्रय मूर्तीची माता झाली ,त्रिभुवनात तिची कीर्ती पसरली .माध्यान काळी अत्री मुनी आश्रमात परत आल्यावर ,सर्व वृतांत अनसूयेने त्याना सांगितला व त्यांनी अंतर ज्ञानाने  सर्व जाणून त्रीमुर्तीना नमस्कार केला .तिन्ही देवानी अत्रीना वर मागण्यास सांगितले असता ,त्रिमूर्ती एकरूप होवून आमच्या पुत्राप्रमाणे आश्रमात राहावे 'हा वर अत्रीनी सांगितला .अत्री ऋषींनी ब्रह्मदेवाचे चंद्र .विष्णूचे दतात्रय व शंकराचे दुर्वास अशी नावे ठेवली .दुर्वास व चंद्र तपाले गेले .विष्णू मूर्ती दत्त म्हणून राहिले .
त्रय मूर्ती ऐक्य होवुनी |दत्तात्रय राहिला आपण |' असे श्री गुरुचे मूळपीठ सिद्धांनी सांगितले .
अनसूयेच्या घरी देखा |त्रय मूर्ती राहिली मूर्ती एका |
नाम दत्तात्रय एका | मूळ पीठ श्री गुरुचे |