श्री गुरुचरित्र
अखण्ड मण्डलाकारं व्याप्तं येन चराचरम्| तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः |
श्री गुरुचरित्र म्हणजे गुरुचे चरित्र ,म्हणजेच शिष्यास दिलेली शिकवण होय .गुरु चरित्राची विभागणी तीन काण्डात केलेली आहे .
अध्याय १ ते २४ ज्ञान कांड
अध्याय २५ ते ३७ कर्म कांड
अध्याय ३८ ते ५१ भक्ती कांड
अवतरणिका ५२
अध्याय १ नाम धारकाला श्री गुरु दर्शनाची असलेली तळमळ व त्याला झालेले श्री गुरु दर्शन
२ सृष्टीची उत्पती ,सिद्ध नाम धारक संवाद ,गुरुमहिमा
३ ईश्वराच्या दशावताराचे कारण
४ श्री दत्तंप्रभूंचा अवतार
५ ते १० श्री पादश्रीवल्लभचा अवतार व त्याचे चरित्र
११ ते ५१ श्री नृ सिंह सरस्वती याचा अवतार व त्याचे चरित्र
५२ अवतरणिका
विषयानुसार अध्यायांची विभागणी :
१. अतिथीसत्कार : अ. ३ , ४ ,५ , १८ , २२ .
२ . पतिनिष्ठा व पतिव्रता धर्म : अ. ८ , २० , २१ , ३० , ३१ , ३२ .
३ . श्रीगुरुंबद्दल निष्ठा , गुरुसेवा , गुरुभक्ती : अ. २ , ९ ,१० , ११ , १३ , १४ , १६ , १७ , १८ , २२ , ४० , ४१ , ४९ .
४ . स्थानमहात्म्य : अ. ७ , १० , १५ , १७ , १८ , १९ , २० , २१ , ४१ , ४८.
५. मूढांचा भ्रमनिरास व गर्वपरिहार : अ. २४ , २७ , ४४ , ४५ .
६ . पूर्व संस्कारांचा प्रभाव : अ . ८ , ९ , ११ , ३३ , ४३ , ५० .
७. भक्तपरीक्षा : अ. १८ , २२ ,४७ .
८. भक्तसंतोष : अ. १३ , २३ , ३८ , ३९ , ४० ,४१ , ४३ , ४६ ,५० .
९. निष्पाप साधेभोळे भक्त : अ . ९ , १७ ,१९ ४३ , ४७ .
१०. भक्तव्याधि व संकटनिरसन : अ. १३ , १४ , २० , २१ , ३० , ३१ , ३२ , ४० , ४४ ,४८ .
११ . तत्वज्ञान : अ. १२ , २० , २१ ,३१ , ३२ ,५० .